घरामध्ये इन्व्हर्टर का लावला जातो तर, वीज गेल्यावर इन्व्हर्टरच्या माध्यमातून घरातील तात्पुरत्या स्वरूपाची का होईना इन्व्हर्टरच्या माध्यमातून वीज वापरता येऊ शकते. मात्र उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथील फरिदाबाद येथे एका इन्व्हर्टरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे या आगीत एकाच कुटुंबातील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. तर सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे.
फिरोजाबाद येथील जसराना भागात मंगळवारी मोठी आग लागली. ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. याशिवाय पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. आगीमुळे एकाच कुटुंबातील नऊपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन मुलं, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक आशिष तिवारी यांनी दिली.
हे ही वाचा :
श्रद्धाला आफताबपासून व्हायचे होते वेगळे
नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी
अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
फिरोजाबाद येथे लागलेल्या भयंकर आगीमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत व्यक्ती बद्दल शोक व्यक्त केला आहे. तर गंभीर जखमींना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमन कुमार यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान आहे. दुकानाच्या वरच त्यांचं कुटुंब राहत होतं. मंगळवारी संध्याकाळी अचानक त्यांच्या घराला आग लागली. आग फारच भीषण होती. येथील नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी उपरस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळवले.