जम्मूच्या नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, ६ जवान जखमी!

गस्ती दरम्यान घडली घटना

जम्मूच्या नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, ६ जवान जखमी!

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी (१४ जानेवारी) झालेल्या सुरंग स्फोटात लष्कराचे ६ जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखा रायफल्सच्या सैनिकांची तुकडी राजौरीतील खंबा किल्ल्याजवळ नियमित गस्त घालत असताना सकाळी १०.४५ च्या सुमारास अचानकपणे स्फोट झाला. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तानुसार त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

भवानी सेक्टरमधील मकरी भागात हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग पेरली जातात. पावसाळ्यात अनेक वेळा हे भूसुरुंग इकडे तिकडे सरकतात. त्यामुळे याचा शोध लागला नाहीतर असे अपघात होतात.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील सब्जियान सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर ९ डिसेंबर रोजी असाच भूसुरुंग स्फोट झाला होता. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना जवानाचा पाय भूसुरुंगावर पडला आणि स्फोट झाला.
या स्फोटात चेन्नईच्या वरिकुंटा येथील रहिवासी असलेले जवान सुबैय्या व्हीव्ही हुतात्मा झाले होते. जवान सुबैय्या व्हीव्ही हे लष्कराच्या ९-मद्रास रेजिमेंटमध्ये सामील झाले होते आणि सध्या ते २५ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये सब्जियान सेक्टरमध्ये तैनात होते.

हे ही वाचा : 

आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल

वाल्मिक कराडवर अखेर मकोका!

महाकुंभमध्ये सहभागी झालेला बाबा होता ‘आयआयटी इंजिनियर’

प. बंगाल मध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या

Exit mobile version