जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी (१४ जानेवारी) झालेल्या सुरंग स्फोटात लष्कराचे ६ जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखा रायफल्सच्या सैनिकांची तुकडी राजौरीतील खंबा किल्ल्याजवळ नियमित गस्त घालत असताना सकाळी १०.४५ च्या सुमारास अचानकपणे स्फोट झाला. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तानुसार त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
भवानी सेक्टरमधील मकरी भागात हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग पेरली जातात. पावसाळ्यात अनेक वेळा हे भूसुरुंग इकडे तिकडे सरकतात. त्यामुळे याचा शोध लागला नाहीतर असे अपघात होतात.
हे ही वाचा :
आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल