इजिप्तच्या लाल समुद्रात ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू!

जखमींना रुग्णालयात दाखल 

इजिप्तच्या लाल समुद्रात ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू!

इजिप्तच्या लाल समुद्रातील हुरघाडा शहराजवळ एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याने किमान सहा परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले आहेत, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. मृतांची राष्ट्रीयता अद्याप निश्चित झालेली नाही, असेही त्यात म्हटले आहे.

मिलालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुमारे २९ जणांना वाचवण्यात आले आहे. चार गंभीर जखमींसह इतर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी (२७ मार्च) सकाळी इजिप्तमधील हुरघाडा शहराच्या किनाऱ्यावर बुडालेल्या या पर्यटन पाणबुडीचे नाव ‘सिंदबाद’ होते. या पाणबुडीत सुमारे ४४ प्रवासी होते.

हे ही वाचा : 

पाकिस्तानातील क्वेटामध्ये आयईडी स्फोटात तीन ठार

दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट

मुंबईत १० कोटींच्या अमली पदार्थांसह ३ जणांना अटक

भाजपा आमदार योगेश सागर यांच्याकडून ‘सामूहिक विवाह सोहळ्या’चे आयोजन!

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी २१ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या.  सिंदबाद पाणबुडीत एकूण ४४ प्रवासी वेगवेगळ्या देशांचे नागरिक होते, जे इजिप्तच्या लाल समुद्राच्या खोलवर प्रवाळ खडक आणि उष्णकटिबंधीय माशांचा शोध घेण्यासाठी गेले होते. ही पर्यटक पाणबुडी समुद्रात ७२ फूट खोलीपर्यंत जाऊ शकते, परंतु काही अज्ञात कारणामुळे ती बुडाली. तथापि, ही पाणबुडी बुडण्याचे कारण अद्याप तपासले जात आहे.

फाजिलपणा हेच पक्षकार्य ? | Mahesh Vichare | Anil Parab | Uddhav Thackeray | Sushma Andhare |

Exit mobile version