हरियाणा: महेंद्रगडमध्ये स्कूल बस उलटली, ६ मुलांचा मृत्यू!

सरकारी सुट्टी असतानाही शाळा सुरू असल्याने प्रश्न चिन्ह

हरियाणा: महेंद्रगडमध्ये स्कूल बस उलटली, ६ मुलांचा मृत्यू!

हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात मुलांनी भरलेली स्कूल बस उलटल्याची दुःखद घटना समोर आली आहे. ४० शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस उलटली आहे.या भीषण अपघातात जवळपास ६ मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.तर १५ हुन अधिक मुले जखमी झाल्याची माहिती आहे.ही घटना जिल्ह्यातील कनिना उपविभागातील उन्हाणी गावाजवळ घडली.

ईदची सुट्टी असूनही शाळा सुरु असल्याने आता प्रश्न निर्माण होत आहे.पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. मीडिया रिपोर्ट्समध्ये अपघाताचे कारण ओव्हरटेक असल्याचे सांगण्यात आले आहे. कनिना ते धनौंडा या मार्गावर शासकीय कन्या महाविद्यालयासमोर ही बस उलटली.

हे ही वाचा:

इंडी आघाडीवाल्यांची ताकद वाढली तर देशाचे तुकडे-तुकडे करतील!

ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही

परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला

रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

या अपघातात ६ मुलांचा मृत्यू झाला. तर १५ हुन अधिक मुले जखमी झाल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस थेट झाडावर जाऊन आदळली आणि उलटली.बसमध्ये एकूण ४० मुले प्रवास करत असल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी मुलांना निहाल हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

निहाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी कौशिक यांनी सांगितले की, त्यांच्याकडे २० मुले आली होती, त्यापैकी पाच मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. उर्वरित जखमींना प्राथमिक उपचारानंतर उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे. जखमींना रोहतक पीजीआय आणि महेंद्रगड येथे पाठवण्यात आले आहे.

Exit mobile version