विराट कोहलीची गणना सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. विराटचे फॅन भारतापुरते मर्यादित नसून तो जगभरातही सर्वांचा आवडचा क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीची मैदानावर आणि मैदानाबाहेरही खूप क्रेझ आहे. पण तुम्हाला माहित आहे का? विराट कोहली यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू आहे. खरं तर विराट कोहली यावर्षी सर्वाधिक गुगल केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या वर्षी आतापर्यंत ६ कोटी ४० लाख युजर्सनी विराट कोहलीला गुगलवर सर्च केले आहे.
कुठे आहेत महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा?
विराट कोहलीनंतर महेंद्रसिंग धोनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी आतापर्यंत २ कोटी ९० लाख युजर्सनी महेंद्रसिंग धोनीला गुगलवर सर्च केले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. या वर्षी आतापर्यंत २ कोटी ८० लाख युजर्सनी रोहित शर्माला गुगलवर सर्च केले आहे. या यादीत विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा असे टॉप-३ मध्ये भारतीय क्रिकेटपटू आहेत.
हेही वाचा :
वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये
ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स
वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली अव्वल
विराट कोहलीची बॅट यंदाच्या आयपीएल हंगामात तळपत आहे. आतापर्यंत विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यात ४९ च्या सरासरीने ९८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध २० चेंडूत २१ धावांची खेळी केली. पंजाब किंग्जविरुद्ध त्याने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मोसमातील पहिला विजय मिळवला.