25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषरेल्वेच्या हेल्पलाइनवर विसरभोळ्यांची गर्दी

रेल्वेच्या हेल्पलाइनवर विसरभोळ्यांची गर्दी

Google News Follow

Related

लोकल प्रवास करताना अनेक प्रवासी प्रवासादरम्यान स्वतःकडील वस्तू लोकलमध्येच विसरत असतात. रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी १५१२ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर दोन वर्षांत लोकल प्रवासादरम्यान वस्तू गहाळ झाल्याच्या आणि वस्तू विसरल्याच्या पाच हजार ६१३ तक्रारींची नोंद झाली आहे. तक्रारींच्या तुलनेने गहाळ झालेल्या वस्तू परत सापडण्याचे प्रमाण फारच कमी आहे. हेल्पलाइनवरील सर्वाधिक तक्रारी या मध्य रेल्वे मार्गावरील आहेत.

रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाइनवर वस्तू हरवणे, विसरणे, महिला किंवा अपंगांच्या डब्यात घुसखोरी, विनयभंग, छेडछाड, फेरीवाले, गर्दुल्ले, भिकारी, मद्यप्राशन करून प्रवास करणारे या विषयीच्या तक्रारी केल्या जातात. २०२० च्या जानेवारी ते डिसेंबर या काळात पाच हजार ६४० आणि जानेवारी ते जुलै २०२१ या काळात दोन हजार ८९५ तक्रारी अशा एकूण ८,५३५ तक्रारी करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा

मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

संशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा

हेल्पलाइनवर येणाऱ्या सर्वाधिक तक्रारी या लोकलमध्ये वस्तू विसरण्याच्या आहेत. ५,६१३ तक्रारी या वस्तू प्रवासादरम्यान लोकलमध्ये विसरल्याच्या आहेत. एकूण तक्रारींपैकी तीन हजार ६१७ तक्रारी मध्य रेल्वेवर आहेत, तर उर्वरित तक्रारी पश्चिम रेल्वेवरील आहेत. वस्तूंमध्ये कार्यालयीन बॅग, महत्त्वाची कागदपत्रे तसेच खरेदी केलेले सामान इत्यादींचा समावेश आहे. तक्रार दाखल केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडून या वस्तूंचा शोध घेतला जातो. पण या वस्तू पुन्हा सापडण्याचे प्रमाण फारच कमी आहे. तक्रारींपैकी आतापर्यंत केवळ २,२६० वस्तूच सापडल्या आहेत.

लोकलच्या राखीव डब्यात घुसखोरी झाल्याच्या तक्रारीही या हेल्पलाइवर होत असतात. २०२० मध्ये अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी झाल्याच्या ३२२ तक्रारी झाल्या होत्या. २०२१ मध्ये तक्रारींची संख्या ५३ होती. महिला डब्यात घुसखोरी केल्याच्या २१० तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींनंतर त्वरित लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करून कार्यवाही केली जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा