ट्रान्स हार्बर लिंकसाठी येणार ५५० झाडांवर संक्रात

ट्रान्स हार्बर लिंकसाठी येणार ५५० झाडांवर संक्रात

पर्यावरण प्रेमाचे गोडवे भरभरून गाताना आपले पर्यावरण मंत्री केवळ माध्यमांवर दिसतात. परंतु शहरात आता बेमालुमपणे झाडांची कत्तल होताना दिसत आहे, त्याबद्दल ब्र सुद्धा बाहेर पडत नाही. शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकसह इमारतीच्या बांधकामासाठी आता तब्बल ५५० झाडांवर संक्रात येणार आहे. एरवी तेरवी पर्यावरणाबद्दल भरभरून बोलणारे आता कुठे गेलेत असा प्रश्न त्यामुळे विचारला जात आहे.

मुख्य बाब म्हणजे , ट्रान्स हार्बर लिंकच्या कनेक्टर आड येणारी ३२९ झाडे कापण्यात येणार आहेत. तसेच वरळीतील खासगी इमारतीच्या बांधकामासाठी ९२ झाडे कापण्यात येणार आहेत. वरळी हा मतदारसंघ तर आपल्या पर्यावरणमंत्री महोदयांचा आहे. आता मग ही वृक्षतोड होत असताना पर्यावरणमंत्री झोपेचे सोंग घेऊन का आहेत असा सवाल आता स्थानिक विचारत आहेत.

हे ही वाचा:

आरक्षणाला कालमर्यादा घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्याला मिठी का मारली?

भारत- श्रीलंका मालिकेलाही कोरोनाचा फटका

निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या

मुंबईत सध्याच्या घडीला झाडांची तोड ही अगदी मोकाटपणे केली जात आहे. पालिकेने झाडे तोडण्यासाठी जणू मोकळे रान दिलेले आहे. नेमलेले कंत्राटदार आणि पालिका यांचे साटेलोटे असल्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये बेमालूमपणे वृक्षछाटणी होताना दिसत आहे. पावसाळ्यानंतर होणारी ही वृक्षछाटणी पाहून पालिकेच्या एकूणच सर्व कामकाजावर संशय व्यक्त होत आहे. लाकडाचे ओंडके भरून ट्रक शहरातून बाहेर जाताना दिसतात. तेव्हा खऱंच या वृक्षतोडीची आता गरज होती का असाच प्रश्न पडतो आहे.

शहराच्या अनेक भागांमधील वृक्षतोड ही नेमकी कुणाच्या वरदहस्तामुळे होत आहे हे मात्र अजूनही कळले नाही. वृक्षतोड करण्यासाठी आलेल्यांना कुणी बोलावले किंवा वृक्षतोड का करताय यावर नीट उत्तरही दिले जात नाही. बेकायदा पद्धतीने ही वृक्षतोड बेमालूपणे सुरू असताना, पर्यावरणाचे बेगडी प्रेम पांघरलेले पिता पुत्र कुठे हरवले. या वृक्षतोडीची आता त्यांना कल्पना आहे की नाही. पालिकेकडून अक्षरशः धडधाकट झाडांची तोड केली जात असल्यामुळे आता अनेक शंका उपस्थित राहात आहेत.

Exit mobile version