उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत वाढत्या तापमानामुळे ५४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यूची कारणे वेगवेगळी असली तरी तीव्र उष्मा हे कारण असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ताप, श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर समस्यांसह मृत्यू आणि रूग्ण रूग्णालयात दाखल होण्याच्या अचानक वाढीमुळे रूग्णालय भारावून गेले आहे, ज्यामुळे तेथील कर्मचारी सतर्क झाले आहेत.उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट पसरली आहे, बहुतेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या उत्तरेकडे असल्याचे आढळून आले.
जिल्हा रुग्णालय बलियाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक एसके यादव यांनी सांगितले की, १५, २० जून रोजी २३ रुग्णांचा मृत्यू झाला आणि काल ११ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती यादव यांनी दिली. आझमगड सर्कलचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ बीपी तिवारी यांनी सांगितले की, मृत्यूच्चे वाढते प्रमाण तसेच या घटनेत कोणता आजार तर आढळत नाही ना ? याचा तपास करण्यासाठी लखनौहून एक पथक येत आहे. जेव्हा वातावरण खूप गरम असते अथवा थंड असते तेव्हा श्वसनाचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि रक्तदाबाच्या रुग्णांना धोका वाढतो. पारा थोडा वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉ. तिवारी यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी
साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली
चिनी कंपनीचा नवा नियम; ‘विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवाल’
परीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!
जिल्हा रुग्णालयात एवढी गर्दी आहे की रुग्णांना स्ट्रेचर मिळेनासे झाले असून अनेक अटेंडंट रुग्णांना खांद्यावर घेऊन आपत्कालीन वॉर्डात जात आहेत.अतिरिक्त आरोग्य संचालकांनी दावा केला आहे की, आमच्याकडे स्ट्रेचर आहेत, परंतु एकाच वेळी दहा रुग्ण आले तर ते अवघड जाते.यूपीचे आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी म्हटले आहे की सरकारने बलिया येथील घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि ते तेथील परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत.संचालक स्तरावरील दोन वरिष्ठ डॉक्टरांना घटनास्थळी पाठवण्यात आले असून ते लवकरच प्रशासनाला लेखी परिस्थितीची माहिती देतील,” ते म्हणाले.
तसेच योग्य माहिती नसताना उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत निष्काळजी विधान केल्याने मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिवाकर सिंग यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे.ते पुढे म्हणाले, प्रदेशातील सर्व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना ताबडतोब प्रत्येक रुग्णाची ओळख पटवून योग्य वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व औषधे सरकारी आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत, आणि कोणत्याही रुग्णाला बाहेरून विकत घेण्याची गरज नाही. मी स्वतः यावर लक्ष ठेवून आहे.