दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना घडली आहे.

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना घडली आहे. भदोही येथे एका दुर्गापूजा मंडपाला आग लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. रविवार, २ ऑक्टोबर रोजी रात्री ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांना रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरू असताना काल उत्तर प्रदेशमधील एका दुर्गापूजा मंडपात आरती सुरू होती. यावेळी मंडपात साधारण १५० भाविक उपस्थित होते. त्यावेळी अचानक आग लागल्यामुळे मंडपात गोंधळ उडाला. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ५२ जण आगीत होरपळले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत दोन मुले आणि एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भदोहीचे डीएम गौरांग राठी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी

‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?

नवरात्री २०२२ : हिंगलाज माता पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ

आग लागल्याची माहिती मिळताच जवळपास २० मिनिटांनी घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version