इराणच्या कोळसा खाणीत स्फोट, ५१ जणांचा मृत्यू, २० जण जखमी!

जखमींना रुग्णालयात दाखल,अजूनही अनेक जण अडकल्याची भीती

इराणच्या कोळसा खाणीत स्फोट, ५१ जणांचा मृत्यू, २० जण जखमी!

इराणमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व इराणमध्ये असलेल्या या कोळसा खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे इराणच्या राज्य माध्यमांनी रविवारी (२२ सप्टेंबर) सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे ५४० किलोमीटर अंतरावर असलेल्या तबासमध्ये कोळशाच्या खाणीत हा स्फोट झाला. मदनजू कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या खाणीच्या बी आणि सी या दोन ब्लॉकमध्ये मिथेन वायूच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली.

दक्षिण खोरासान प्रांताचे गव्हर्नर अली अकबर रहिमी यांनी रविवारी सरकारी टीव्हीला सांगितले की, देशातील ७६ टक्के कोळसा या प्रदेशातून पुरविला जातो आणि मदनजू कंपनीसह सुमारे ८ ते १० मोठ्या कंपन्या या प्रदेशात काम करत आहेत. ते पुढे म्हणाले, ब्लॉक बी मधील बचाव कार्य पूर्ण झाले आहे. तर सी ब्लॉकमध्ये बचावकार्य सुरू आहे.  स्फोट झाला तेव्हा खाणीत जवळपास ७० लोक काम करत असल्याची माहिती आहे. खाणीत अजूनही २४ जण अडकले असण्याची शक्यता आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सवर अमित शहांचा प्रहार

हुजूरपागा मुलींच्या शाळेत “ईद ए मिलाद”ची आवश्यकता काय?

बेंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती; महिलेच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, यावेळीही रुळावर ठेवले सिलेंडर!

दरम्यान,  शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री ९ वाजता (स्थानिक इराण वेळेनुसार) हा स्फोट झाला, असे राज्य माध्यमांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील तपासणी सुरु केली आहे.

Exit mobile version