बुलढाण्यात जवळपास ५०० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा गावामध्ये ही घटना घडली आहे. एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यामधून जवळजवळ ५०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोमठाणा गावामध्ये एकदशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या फराळाचे प्रसाद वाटप करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरूवात झाली. कार्यक्रमानंतर महाप्रसाद म्हणून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली होती. खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील अनेकांना उलट्या, पोटदुखी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे खळबळ उडाली. भगर आणि आमटी खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे ४५० ते ५०० जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून त्यांच्यावर बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
हे ही वाचा:
बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!
इसिसला भाजपा कार्यालये आणि हिंदू नेत्यांना करायचे होते लक्ष्य
फातिमा झाली कविता, अब्दुल्ला झाला शिवप्रसाद
सध्या ४०० जणांवर उपचार सुरू आहेत. या ४०० जणांव्यतिरिक्त विषबाधा झालेल्यांपैकी १०० ते १२० जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. यामध्ये काही वृद्ध नागरिकांचाही समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाला या घटनेची माहिती होताच घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला आणि पुरूषांना मिळेल त्या वाहनाने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं.