महाराष्ट्र शासन यांच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा प्रमोद महाजन मैदान, कांदिवली (पूर्व) मतदार संघामध्ये याचे आयोजन केले होते. हा महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत या महारोजगार मेळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. या महामेळाव्यात एकूण ३३ कंपन्यांचे स्टॉल होते. त्यात वेगवेगळ्या नामांकित कंपन्या नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज होत्या. महारोजगार मेळ्याव्यात रोजगारासाठी एकूण चार हजारांच्या वर इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातून ३००० च्या आसपास उमेदवारांनी या महारोजगार मेळाव्याला भेट दिली. त्यातील जवळ जवळ ५०० उमेदवारांना रोजगारही मिळाले. त्यांना १२ हजार ते २८ हजारापर्यंत इतके वेतन मिळाले आहे.
रोजगार मेळाव्याआधी उमेदवारांकडून फॉर्म भरून घेतले गेले. त्या फॉर्मची छाननी केली गेली. त्याप्रमाणेच कंपन्यांची निवड केली गेली. कारण इकडे उमेदवार आल्यानंतर वेगळ्या जॉबची गरज होती आणि इकडे वेगळेच स्टॉल उपलब्ध आहेत, याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे इथे आलेल्या उमेदारांना रोजगार जास्तीत जास्त मिळाले.
यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले की, ३००० हजार युवक-युवतींनी या महारोजगार मेळाव्यात नोंदणी केली होती. ३२ स्टॉलचे अधिकारी उपस्थित होते. ज्यांना स्वयंरोजगार करायचे आहे त्यासाठी मुद्रा लोनची माहिती देणारे स्टॉलही आहेत. हा एक चांगला रोजगार मेळावा संपन्न झाला असे ते यावेळी म्हणाले.
प्रमोद महाजन मैदानात महारोजगार मेळाव्यात एकूण ३३ नामांकित कंपन्यांचे स्टॉल इच्छुक उमेदवारांना आपल्या कंपनीत सामावून घेण्यासाठी सज्ज होते. या स्टॉलवर उमेदवार त्यांच्या शिक्षणाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे आणि त्यांना कुठल्या क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे हे पाहून इंटरव्ह्यू देत होते.
हेही वाचा :
‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी
अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित
भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?
यावेळी सागर कदम या उमेदवाराने नोकरी मिळाल्याने आनंद व्यक्त केला. त्यांनी असे सांगितले की, मी नोकरीच्या शोधात होतो आणि या रोजगार मेळाव्यात मला ही संधी आमदार अतुल भातखळकर यांच्यामुळे मिळाली. त्यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली़. रश्मी घाग यांनी नोकरी मिळत नाही, रोजगार मिळत नाही आणि मला इथे नोकरी मिळाली आहे. मी खूप आनंदी आहे, अशी भावूक प्रतिक्रिया दिली. तर मानषी शिरसकर हिने नोकरी मिळाल्याने आनद व्यक्त केला.
रोजगारांच्या स्टॉलबरोबर स्वयंरोजगार, मुद्रा लोन, शासनाच्या अनुदानाचेही स्टॉलही या स्वयंरोजगारात होते. त्यात इच्छुकांना कशा प्रकारे कर्ज घेऊ शकता, शासनाच्या योजनांचा फायदा कसा घेऊ शकता, याचे मार्गदर्शन केले जात होते. तुम्ही शिक्षणासाठी, शेतीसाठी, व्यवसायासाठी कसे कर्ज घेऊ शकता, याचे उत्तम प्रकारे सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्ट़ॉलवर भेट देणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीला पटवून दिले जात होते. या स्टॉलला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.