राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून गणेशाेत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी माेफत एसटी सेवेचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. काेराेनाचे निर्बंध दूर झाल्यानंतर यंदाच्या वर्षी चाकरमानी माेठ्या प्रमाणावर काेकणात जात आहेत. रेल्वे बुकिंग अगाेदरच फुल झाल्यामुळे अनेक चाकरमान्यांची गैरसाेय हाेत आहे. ही गैरसाेय लक्षात घेऊन काेकणवासीयांना आपल्या गावी जाऊन गणेशाेत्सव धुमधडाक्यात साजरा करता यावा, यासाठी मुंबई भाजपच्यावतीने ५०० एसटी बसेस काेकणात रवाना करण्यात आल्या आहेत.
आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अंधेरी येथून ३० बसेस रवाना करण्यात आल्या. भाजपने जवळपास २० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांना माेफत प्रवास उपलब्ध करून दिला आहे. रविवारी रात्री १० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणखी एसटी बस साेडण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले
न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ
धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम
नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय
गेल्या वर्षी गणेशाेत्सवात भाजपने काेकणवासियांना गणपती सणाला जाणे सुकर व सुरक्षित व्हावे म्हणून माेदी एक्सप्रेस विशेष गाडी साेडण्यात आली हाेती. या विशेष गाडीला काेकणच्या प्रवाशांकडून माेठा प्रतिसाद मिळाला हाेता. रेल्वे आणि बस फुल झाल्यानंतर खासगी बसने जाण्याशिवाय काेकणवासियांना पर्याय नसताे. पण खासगी ट्रॅव्हल्सचे अव्वाच्या सव्वा भाडे परवडणारे नसते. ही गरज लक्षात घेऊन या वर्षी भाजपच्यावतीने २८ ऑगस्टला माेदी एक्सप्रेस साेडण्यात येणार आहे.