भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून

भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून

देशाच्या एकूण कोविड-१९ केसेस पैकी ८५ टक्के केसेस या केवळ सहा राज्यांमधून येत आहेत. यामध्ये अव्वल स्थान महाराष्ट्राने पटकावले आहे. गुरुवारी, २४ तासात एकूण २२ हजार ८५४ केसेस देशात नोंदवल्या गेल्या. यापैकी सर्वात जास्त म्हणजे १३,६५९ केसेस या महाराष्ट्रातून नोंदवल्या गेल्या आहेत. या खालोखाल केरळ, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यानंतर सर्वात जास्त केसेस या गुरवारी नोंदवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात कोविड-१९ च्या केसेस पुन्हा एकदा वाढत आहेत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये केसेस वाढत असल्यामुळे नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जालना, यवतमाळ आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी नाईट कर्फ्यू जाहीर केला गेला आहे. याशिवाय नागपूरमध्ये आजच पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राची उपराजधानी टाळेबंदीत

महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन करण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत अनेक मंत्र्यांनी दिले आहेत. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोविड-१९ चा प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय नसल्याचे सांगितले आहे.

भारतात इतर राज्यांमधील कोविड-१९ च्या केसेस गेले अनेक महिने कमी झाल्या आहेत. त्यामुळे या सहा राज्यांनी केसेसवर नियंत्रण आणल्यास देशाचा कोविड-१९ केसेसचा प्रश्न कमी होणार आहे.

Exit mobile version