मुंबईतील ५० टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

मुंबईतील ५० टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, एक नवीन माहिती समोर आलेली आहे. मुंबईतील बहुतांश मुलांमध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आढळून आल्याचे समोर आलेले आहे. सेरोने केलेल्या अहवालानुसार या गोष्टीचा खुलासा झालेला आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे ५१.१८% मुलांच्या सर्वेक्षणात प्रतिपिंडे आढळलेली आहेत. त्यामुळेच आता संभाव्य तिसरी लाट आल्यावर काय चित्र असेल असाच प्रश्न आता पडलेला आहे.

रक्तामध्ये प्रतिपिंडे आढळणे म्हणजे, आपल्याला कोरोनाची बाधा झालेली आहे हे स्पष्ट होते. महत्त्वाचे म्हणजे संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असल्यामुळे धोका उद्भवला नाही, ही दिलासादायक बाब आहे. एकूणच काय तर या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे न आढळल्यामुळे यांना कोरोना होऊन गेला हे कळलेच नव्हते. त्यामुळेच आता यापुढे अधिक सजग राहणे हे फारच गरजेचे आहे.

हे ही वाचा:

बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा

नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका

अनिल देशमुखांच्या अडचणींत का होणार आहे वाढ?

ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा

महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बालकांचे सर्वेक्षण केले असून, शहरातील २४ वॉर्डांतून २ हजार १७६ नमुने गोळा करण्यात आले. हे सर्वेक्षण १ एप्रिलपासून सुरू झाले होते, त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट सुरु होती अशी माहिती नायर रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी दिलेली आहे.

प्रतिपिंडे असणारे ५३,४ टक्के हे १० ते १४ या वयोगटातील सर्वाधिक आहेत. सेरो सर्व्हेक्षणानुसार ५० टक्के पेक्षा जास्त मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळलेली आहेत.योगायोगाने, दिल्लीत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातही जवळपास ५९ टक्के मुलांना विषाणूचा धोका असल्याचे दिसून आले.

तिसरी लाट आता तोंडावर आहे, त्यामुळे अनेक बालरोग तज्ज्ञही सरकारकडे किमान पायाभूत सुविधा असायला हव्यात याकडे लक्ष देण्यास सांगत आहे. पालिका आयुक्त चहल म्हणाले, तिसरी लाट येण्याआधीची पालिकेने तयारी सुरू केलेली आहे. प्रौढांप्रमाणेच मुलांना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे तिसरी लाट तोंडावर असतानाच आता ठाकरे सरकारने जागे व्हायला हवे.

Exit mobile version