दोन दिवसांच्या गोंधळानंतर पाच टप्प्याचा अनलॉक जाहीर

दोन दिवसांच्या गोंधळानंतर पाच टप्प्याचा अनलॉक जाहीर

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी अनलॉकबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर काल ४ जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जिथे ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.

हे ही वाचा:

राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो

‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’

राज्यात सध्या तीन सरकारं

कोरोना आजार नाही,अल्लाहची माफी मागून होईल सुटका! सपा खासदाराची मुक्ताफळे

पहिला टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील.

चौथा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

Exit mobile version