24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषछत्तीसगडच्या सुकमा येथे ५ नक्षलवाद्यांना अटक !

छत्तीसगडच्या सुकमा येथे ५ नक्षलवाद्यांना अटक !

मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन बॅरल ग्रेनेड लाँचर शेल आणि टिफिन बॉम्बसह स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या नक्षलवाद्यांना जागरगुंडा पोलिस स्टेशन परिसरातून पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), बस्तर फायटर्स आणि जिल्हा बापल यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडाजवळ सिंगावरम वळणावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची माहिती या नक्षलवाद्यांना मिळाली होती. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढण्यासाठी सिव्हिल ड्रेसचा वापर करून लपण्याचा आणि पळण्याचा प्रयत्न केला परंतु ते असफल राहिले.

हे ही वाचा:

मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना, महिलेचा मृत्यू!

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा तर ५ दहशतवादी ठार!

एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारता पाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव

गणेश नाईक म्हणतात ते दलाल कोण ?

पोलिसांनी सांगितले की, हेमला पाला (३५), हेमला हुंगा (३५), सोदी देवा (२५), नुप्पो (२०) और कुंजम मासा (२८) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. हे सर्वजण चिंतलनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून सुरापानगुडा येथे मिलिशिया सदस्य म्हणून कार्यरत होते.  अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडून दोन घरगुती बॅरल ग्रेनेड लाँचर (BGL) शेल, एक टिफिन बॉम्ब, सात जिलेटिन काठ्या, नऊ डिटोनेटर, स्फोटक पावडर आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा