25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषगोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत

Google News Follow

Related

गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गोरेगावमधील आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक केला असून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून ५८ जण जखमी झाले आहेत.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली ते म्हणाले, या दूर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.’या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

‘न्यूजक्लिक’ने अमेरिकी उद्योगपतीकडून स्वीकारले २८.२९ कोटी रुपये!

उद्धव ठाकरेंची महायुती सरकारच्या सीबीआय चौकशीची मागणी

ठाकरे गटाला धक्का; आमदार अपात्रता सुनावणी ३ नोव्हेंबरला

अंधारेबाई तर तुमच्या कानाजवळ डी जे वाजवू!

पंतप्रधान मोदींनी देखील या घटनेची दाखल घातली.पंतप्रधानांनी या संदर्भात ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, गोरेगाव दुर्घटनेतील जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती मदत प्रशासन करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा