नाशिक खासगी बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ जण जखमी झाले आहेत. नाशिक- औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे.
“नाशिक येथे झालेला अपघात हा अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारा आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत,” असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात ११ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 8, 2022
“नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी देत शोक व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. #Nashik— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2022
“नाशिक येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो,” अशा भावना अमित शहा यांनी व्यक्त केल्या आहेत.
नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो.
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2022
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी ५० हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of the deceased due to the bus fire in Nashik. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 8, 2022
यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात या बसला पहाटे ४.२० च्या दरम्यान अपघात झाल्यानंतर आग लागली. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.
हे ही वाचा:
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन
मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात खासगी बस जळून खाक झाली आहे. अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.