सोमवार, ३१ ऑक्टोबर रोजी सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यादरम्यान, मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घातला. मिरज पंढरपूर महामार्गावर जुनोनी येथे पायी दिंडीत थेट कार घुसल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी बांधवांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच याचवेळी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. याशिवाय जखमी वारकरी बांधवांवर तातडीने उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
मृत वारकरी बांधवांच्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून जखमी वारकरी बांधवांना तातडीने योग्य ते उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 31, 2022
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी
फडणवीसांच्या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरेंकडून पुरावे नाहीतच
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
कोल्हापुरातील वारकऱ्यांची दिंडी काल संध्याकाळी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्यावर पोहचला. त्यावेळी मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी टाटा नेक्सॉनची कार थेट दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे गेली. पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून, त्यासोबतच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात पाच महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.