मुंबईतील कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास सध्या सुरू असून बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. अपघातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 10, 2024
मुंबईत कुर्ला एलबीएस रोडवर बेस्ट बसने अनेक पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली. यासंदर्भात काही सीसीटीव्ही क्लिप समोर आल्या असून त्यात एका रिक्षाला या बसने जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. त्या रिक्षाला काही अंतरापर्यंत त्या बसने फरफटत नेल्याचेही दिसते आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या अनेकांना तसेच दुचाकींना त्या बसने ठोकरल्याचेही सीसीटीव्हीत दिसते आहे.
हे ही वाचा:
लालूप्रसाद यादव म्हणतात, ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममतांना द्या
श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेले २१ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले
नागरी हक्कांसाठी सहाय्यक ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय-अमेरिकन हरमीत धिल्लन कोण आहेत?
माजी परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांचे निधन
बेस्टची ३३२ क्रमांकाची कुर्ला रेल्वे स्टेशन ते अंधेरी स्थानक या मार्गावरील ही बस होती. रात्री ९.२० वाजता कुर्ला रेल्वे स्टेशन वरून बस निघाली. न्यू मॉडेल टॉकीज येथे पोहोचल्यावर भरधाव वेगात ही बस समोरील वाहनांना धडकत काही अंतरावर गेली. आंबेडकर नगर चौक येथील कमानील बस धडकल्यानंतर थांबली. या बसच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अपघातामागील कारणे शोधली जात आहेत.