उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी एक मोठी भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हाय टेंशन वायर पडल्याने बसला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या अनेकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ही घटना गाझीपूरमधील मर्दाह शहरात घडली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्यांना पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाईही जाहीर केली आहे आणि जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
हे ही वाचा..
शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”
मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!
निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारी देण्याचे एसबीआयला निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न समारंभासाठी प्रवाशांना घेऊन जाणारी बस हाय टेंशन ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यानंतर हा अपघात झाला.मात्र, ही बस कुठून येत होती आणि कुठे जात होती, याची अद्याप माहिती पुढे आलेली नाही.बसमध्ये जवळपास ५० जणांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे. डीआयजी वाराणसी ओपी सिंह यांनी सांगितले की, ४-५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या अधिकारी घटनास्थळी असून मदतकार्य सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.