पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक; भारतानेही पाच-सात पाक रेंजर्स टिपले

त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना

पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक; भारतानेही पाच-सात पाक रेंजर्स टिपले

आंतरराष्ट्रीय सीमेवर आठ दिवसांत दोनदा युद्धविरामाचे उल्लंघन करताना पाकिस्तानने जम्मूधील अरनिया क्षेत्रामध्ये सर्व आठ चौक्यांवर बेछूट गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान आणि चार नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री उशिरा रहिवासी परिसरातही गोळीबार केला. भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्याचे तसेच, पाच ते सात सैनिक ठार झाल्याचे समजते.

 

 

तर, पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या दोन भारतीय सैनिकांना उपचारासाठी जम्मू मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आले आहे. जोरदार बॉम्बवर्षावामुळे सीमा सुरक्षा दलाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचा आणि वीज बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबारातही दोन जवान जखमी झाले होते. पोलिसांनी सीमेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून गाड्यांची तपासणी सुरू केली आहे. येथून आंतरराष्ट्रीय सीमा केवळ दीड किमी दूर आहे. बाहेर पडलेल्या लोकांना घरात जाण्यासाठी सांगितले जात आहे. तर, आयबीने दिलेल्या माहितीनुसार, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यात पाकिस्तानचे पाच सैनिक मारले गेले आहेत.

हे ही वाचा:

‘तरुणांनी आठवड्याचे ७० तास काम करावे’

इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार; गाझामधील बळींची संख्या सात हजारांवर

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

कुपवाडामध्ये पाच दहशतवादी ठार

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना भारताच्या सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. हे सर्व दहशतवादी लश्कर-ए-तैयबा संघटनेचे असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू पोलिसांकडून संयुक्त शोधमोहीम सुरू आहे. त्यांच्याकडून सगळीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Exit mobile version