सध्या महाराष्ट्रात कोविडचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी, ऑक्सिजनचे वहन वेगाने व्हावे यासाठी रेल्वेचे सहाय्य घेतले जात आहे. त्यासाठी रेल्वेने वेगवेगळ्या मार्गांवर ऑक्सिजन एक्सप्रेस देखील चालवल्या आहेत. महाराष्ट्रात चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस रविवारी पहटे दाखल झाली. या गाडीतून तब्बल ६० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन आणण्यात आला. या गाडीने ओडिशामधील आंगूल येथून महाराष्ट्रासाठी प्राणवायू आणला होता.
देशभरात चालवण्यात येणाऱ्या या गाड्या रो-रो पद्धतीने चालवल्या जात आहेत. ही चौथी गाडी रविवारी पहाटे २.२५ वाजता नागपूरला दाखल झाली. आत्तापर्यंत महाराष्ट्राला रेल्वेमार्गाने एकूण २९० मेट्रीक टन प्राणवायूचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका उच्चाधिकाऱ्याने दिली. ऑक्सिजन एक्सप्रेसचा मार्ग हा त्यामार्गातील घाट, वळणे, चढ-उतार पाहून निश्चित केला जात असल्याची माहिती देखील यावेळी प्राप्त झाली आहे.
हे ही वाचा :
मुलुंडमध्ये रेकॉर्डब्रेक रक्तदान
ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस
क्रिकेट बुकी जालान म्हणतो, परमबीर सिंह यांनी माझ्याकडून खंडणी उकळली
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर मिळणार काँग्रेसला अध्यक्ष
महारष्ट्रात यापूर्वी तीन ऑक्सिजन एक्सप्रेस चालल्या होत्या. त्यापैकी पहिली गाडी विशाखापट्टणम् ते नाशिक/ नागपूर अशी धावली. या गाडीवर सात टँकर होते. दुसरी गाडी हापा ते कळंबोली या मार्गावर तीन टँकर घेऊन धावली आणि तिसरी गाडी अंगूल ते नागपूर चार टँकर घेऊन धावली.
सध्या महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रात कोविड उपचाराशी निगडीत विविध वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.