बोरिवलीत बिल्डिंग कोसळली; पण बरे झाले आधीच खरे खाली केली

कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती

बोरिवलीत बिल्डिंग कोसळली; पण बरे झाले आधीच खरे खाली केली

borivali gitanjali building

आदल्या दिवशीच इमारत खाली केली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता बोरीवलीतील गीतांजली ही चार मजली इमारत अचानक पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली.गेल्या काही दिवसांपासून बोरिवलीमध्ये जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे ही इमारत खचली होती. प्रसंगावधान राखून ही इमारत अगोदरच रिकामी करण्यात आल्यामुळे अनेक रहिवाशांचा जीव वाचला आहे.

बोरिवली पश्चिम भागातील ही इमारत जुनी आणि जीर्ण झालेली होती. मुंबई महानगर पालिकेने ही ईमारत मोडकळीस आलेली म्हणून जाहीर केले होते इमारत कोसळल्यावर घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक रवाना झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भातील व्हीडिओ आता समोर आला असून त्यात ही इमारत पडताना दिसते आहे. ही इमारत पडण्याच्या स्थितीत होती. ती खचत असल्यामुळे रहिवाशांनी आधीच ती सोडली होती. इमारत पडत असताना लोक तिथे लांब उभे राहून इमारत पडत असताना बघत होते. थोड्याचवेळात इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि सगळीकडे मातीचे ढिगारे पसरले.

हे ही वाचा:

समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज

सिसोदियांच्या घरी सीबीआय

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

जेमतेम छो वरळी

 

गीतांजली इमारतीमध्ये आठ फ्लॅट होते. इमारत खचलेली असल्यामुळे काही कुटुंब अगोदरच इमारत सोडून गेले होते. अग्निशमन दल, पोलिस यांचे पथक घटनास्थळी पोहचले आहेत. इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ढिगारा जमला आहे. हा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्या खाली कोणी अडकले आहेत का याचा शोध घेण्यात येत आहे. या दुर्घटनेत अजून तरी जीवितहानी झाली नसल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version