रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण

रेल्वे मृत्यू दर यंदाही वाढलेलाच

रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकलमधून पडून सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एकूण ३५६ प्रवाशांचा समावेश आहे. २०२१ च्या तुलतेन २०२२ मध्ये सर्वाधिक रेल्वे प्रवाशांची मृत्यू झाल्याची माहीती मिळाली आहे. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गातील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल आणि मेल एक्स्प्रेसमधून गेल्या नऊ महिन्यांत एकूण ४८७ प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच रेल्वे गाड्यांमधून २०२१ मध्ये मुंबई विभागात २७७ जणांचा मृत्यू झाला होता. अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि पश्चिम मार्गावरील बोरिवली व वसई या लोहोमार्गाच्या हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तर अशा अपघातात प्रवाशांची मृत्युमुखी पडण्याची संख्या ही मोठी दिसून येते. तसेच नऊ महिन्यात ७२५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे २०११ मध्ये रेल्वेगाड्यांमधून पडून २७७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४४२ प्रवासी जखमी झाले आहेत.

हे ही वाचा

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

काश्मीरच्या सार्वजनिक उद्यानात फडकला १०८ फूट उंच तिरंगा

मुंबई उपनगरीय लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये लोकल तसेच मेल-एक्सप्रेसमधून पडून ४८७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ४४४ पुरुष आणि ४३ महिलांचा समावेश आहे. तर यंदा ही आकडेवारी पाहता अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version