यवतमाळमध्ये पुरात ४५ जण अडकले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून  

यवतमाळमध्ये पुरात ४५ जण अडकले

राज्यासह विदर्भात मागील काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. यादम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे ४५ लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनाची संपर्क साधला असून मदत पुरविण्याचे काम सुरू आहे. भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहचणार असून त्यांच्या मदतीने नागरिकांना बाहेर काढण्यात येणार आहे. सुमारे २३१ मिमी पाऊस झाला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या दोन्ही तालुक्यात आणि सातपुडा पर्वतात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील जवळपास १४० गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक मार्ग बंद पडले आहेत.

हे ही वाचा:

इर्शाळवाडीमधील अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व एकनाथ शिंदे स्वीकारणार

विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू

जळगावच्या हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. हतनूर धरणातून ६८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वाहतूक बंद पडली असून हिंगणघाट तालुक्यातील आलमदोह ते अलिपूर मार्ग यशोदा नदीच्या प्रवाहामुळे रात्रीपासून ठप्प पडला आहे.

Exit mobile version