बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कलाकार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू यातील आहेत. त्यामुळे राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.
राम सेतू या चित्रपटाची शूटींग मड आयलँडला होत आहे. या शूटींगसाठी काल १०० नवीन ज्युनिअर आर्टिस्ट काम सुरु करणार होते. मात्र कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यातील ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेइम्प्लॉईजने (एफडब्लूआयसीई) दिलेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाच्या टीमने पूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र दुर्देवाने ४५ ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या
सामान्य जनतेसाठी लॉकडाऊन, मंत्री मात्र विनामास्क प्रचारात
अमित शाहांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. “आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. असेही अक्षय कुमार म्हणाला आहे.