खेड तालुक्यातील २८ गावांमधील ४४ वाड्या डेंजर झोनमध्ये

अहवालातून आकडेवारी समोर

खेड तालुक्यातील २८ गावांमधील ४४ वाड्या डेंजर झोनमध्ये

रायगड जिल्ह्यातल्या खालापूर येथील इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे. विशेष म्हणजे हे दुर्घटनाग्रस्त गाव दरडग्रस्त गावांच्या यादीतचं नसल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर कोकणातल्या दरडग्रस्थ गावांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दररडप्रवण क्षेत्र असणाऱ्या गावांचा अहवाल नुकताच प्रशासनाने जाहीर केला.

राज्य सरकारने सूचना केल्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार खेड तालुक्यात २८ गावांमधील ४४ वाड्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्याठिकाणी या पूर्वीदेखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील शिरगाव हे चारही बाजूने डोंगराने वेढलेल्या संपूर्ण गावालाच दरडप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या गावातील आठ वाड्यांना दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील शिरगाव हे गाव चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले आहे. गेल्या चार वर्षांपासून या गावात सतत डोंगर खचून दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. २०२१ साली या गावातील काही वाड्यांनजीक दरड कोसळली होती. अतिवृष्टीत आणखी दरड कोसळण्याची शक्यता असते.

हे ही वाचा:

‘आदेश नसतानाही यासिन मलिकला न्यायालयात का आणले?’

दिल्लीतील दोन मशिदींना इशारा; अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर कारवाई

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले बालासोर अपघाताचे कारण

विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

गेल्या काही वर्षात पावसाळ्यात अपघात घडण्याच्या अनेक घटना रायगडमध्ये घडल्या आहेत. तळीये गावसुद्धा रायगडमध्ये होते. तर, तीन दिवसांपूर्वी दरड कोसळलेले इर्शाळवाडी हे ही रायगड जिल्ह्यात आहे. कोकणात दरड कोसळण्याचा आणि जीवितहानी झाल्याच्या मोठ्या घटना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात घडल्या आहेत. शिवाय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या एका तालुक्यात २८ गावांमधील ४४ वाड्या दरड कोसळण्याच्या धोकादायक स्थितीमध्ये असल्याचे अहवालातून समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version