23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषभारत-पाक सामन्यासाठी विमानांचे भाडे 'हवेत'

भारत-पाक सामन्यासाठी विमानांचे भाडे ‘हवेत’

४१५ टक्के इतकी वाढ

Google News Follow

Related

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाण्याची योजना आखणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे.अहमदाबादला जाण्यासाठी विमान भाडे प्रत्येकी ५,५०० ते १२००० रुपये इतके झाले आहे. तसेच हॉटेल्सच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.हॉटेल्सनी प्रति रात्र प्रति रूम ८०,००० रुपये इतके जास्त शुल्क आकारले आहे.वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त फ्लाइट तैनात करण्याची शिफारस ट्रॅव्हल ऑपरेटर करत आहेत.

आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला अवघे २५ दिवस शिल्लक आहेत.सामना अहमदाबाद मध्ये होणार आहे.सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची एकच झुंबड उडाली आहे.बऱ्यापैकी हॉटेल्सची विक्री झाली असून किरकोळ दराने अजूनही विक्री सुरु आहे.वाढत्या मागणीमुळे विमान भाडेही वाढल्याचे दिसून आले त्यामुळे क्रिकेट प्रेमींना सामना पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातून अहमदाबादला जाणाऱ्या विमानांच्या हवाई भाड्यात ४१५% इतकी वाढ झाली आहे.जर क्रिकेट चाहत्यांनी चंदीगड, जयपूर, लखनौ, मुंबई, दिल्ली,कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पाटणा, भोपाळ, भुवनेश्वर आणि पुणे यांसारख्या ठिकाणावरून येण्यासाठी २५-३० दिवस अगोदर तिकिटे बुक केल्यास त्यांना प्रत्येकी ५,५०० रुपये आणि १२,००० रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे.त्यामुळे “सामन्याच्या दिवसांमध्ये अहमदाबादला भेट देणे महागडे ठरणार आहे.

हे ही वाचा:

कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता

कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन

अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !

३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण

अहमदाबादला सामना होणार असल्याने फ्लाइटला अधिक मागणी आहे.त्यामुळे फ्लाइटचे भाडे वाढणे हे बंधनकारक असल्याचे एका ट्रॅव्हल ऑपरेटरने सांगितले.तसे पाहायला गेले तर हवाई भाड्यात झालेली वाढ ही जास्त नाही कारण अजून क्वालिफायर आणि फायनल सामना बाकी आहे.ट्रॅव्हल ऑपरेटर्सनी शिफारस केली आहे की तेथे अतिरिक्त फ्लाइट तैनात करणे आवश्यक आहे.अतिरिक्त फ्लाइटच्या वाढीसाठी एअरलाइन्सने १३-१६ ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादला अतिरिक्त उड्डाणे तैनात करणे आवश्यक आहे जेणेकरून येथून येणार्‍या किंवा निघणार्‍या प्रवाशांना अतिरिक्त लाभ मिळू शकेल,” ट्रॅव्हल एजंट्स आणि टूर ऑपरेटर असोसिएशन ऑफ गुजरात (TAG) चे अध्यक्ष अनुज पाठक म्हणाले.

दुसरीकडे,प्रायोजक, क्रिकेट चाहते आणि व्हीव्हीआयपींनी हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम बुक केला आहे.आयसीसीचे चार सामनेशहरात होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमुळे अहमदाबादमधील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी भरपूर कमाई होईल आणि तिसर्‍या तिमाहीची ही चांगली सुरुवात असेल,” ITC नर्मदाचे सरव्यवस्थापक कीनन मॅकेन्झी म्हणाले.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अभिनेता रजनीकांत यांना सुवर्ण तिकीट दिले आहे.
क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून त्यांना तिकीट देण्यात आले आहे.भारतीय क्रिकेट संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार असून रजनीकांत स्टेडियमवर उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा