हृदय आणि यकृत यांसारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींबाबत केंद्र सरकारने दिलासादायक असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने हृदय आणि यकृत यांसारख्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यात ४१ विविध औषधांचा समावेश आहे.
हृदय, यकृत, शुगर, वेदना, संसर्ग, मल्टीविटामिन, अँटासिड, अँटीबायोटिक्ससह ४१ औषधांचे आणि सहा फॉर्म्युलेशनचे दर सरकारने निश्चित केले आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथॉरिटीच्या १४३ व्या बैठकीत औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. तसेच कंपन्यांना ही माहिती डीलर्सला तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औषध कंपन्या ग्राहकांकडून औषधाच्या किंमतीव्यतिरिक्त फक्त जीएसटी आकारू शकतात, असेही सरकारी निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
देशातील अनेक लोक इन्फेक्शन, शुगर, हृदय, यकृतसंबंधित आजारांशी झुंज देत असतात. या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे महाग असून अनेकदा सर्वसामान्यांच्या खिशाला ही औषधे परवडत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन औषधांच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एनपीपीएच्या बैठकीत ४१ औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
लालूप्रसाद, अब्दुल्ला मोदींच्या पत्नी-मुलांवरून टीका करण्यापर्यंत घसरले!
बरेलीची फरजाना बनली पल्लवी; मुरादाबादची नर्गिस बनली मानसी!
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉलला अलविदा!
चाललंय काय? भारत चंद्रावर पोहोचला, कराचीतली मुले मात्र गटारात!
यापूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये देखील नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथॉरिटीने मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ६९ औषधांच्या किंमती कमी केल्या होत्या. नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथॉरिटी ही एक सरकारी नियामक संस्था आहे जी भारतातील फार्मास्युटिकल औषधांच्या किमती नियंत्रित करते.