‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ४०८ मुलांची सुटका

मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ४०८ मुलांची सुटका

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ४०८ मुलांची सुटका करुन त्यांना वाचवण्याची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सरकारच्या समन्वयाने ४०८ मुलांची सुटका केली आहे. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत वाचवण्यात आलेल्यांमध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

हे ही वाचा:

पुरातत्त्व खात्याला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी

मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.२ टक्के; अर्थात २० कोटी

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सऍपवर तक्रार

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवारांच्या पाठीशी

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानाना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

Exit mobile version