मोरबीचा झुलता पूल कोसळला, ५०० हून अधिक लोक बुडाले

मोरबीचा झुलता पूल कोसळला, ५०० हून अधिक लोक बुडाले

गुजरातच्या मोरबी येथे मच्छू नदीवर बांधण्यात आलेला झुलता पूल रविवारी संध्याकाळी अचानक कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. पूण तुटल्यानंतर नदीमध्ये शेकडो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा रहदारीचा पूल होता,. दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर ५०० पेक्षा जास्त लोक होते. सर्व नदीमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे . पर्यटकही यावेळी पुलावर होते त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पोलिस आणि प्रशासनासोबत स्थानिक लोकही बचावकार्यात सहभागी झाले आहे

शहरातील हा प्रसिद्ध झुलता पूल मणी मंदिराजवळील मच्छ नदीवर आहे . गेले सहा महिने हा पूल बंद होता. नववर्षानिमित्त मोरबीचा झुलता पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता  . मोरबीचा हा झुलता पूल १४० वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे ७६५ फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे.

हे ही वाचा:

सूर्यदेव आणि सौर ऊर्जेबद्दल पंतप्रधान मोदींना काय वाटते?

सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

या पुलाचे उद्घाटन २० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते झाले. १८८० मध्ये त्या वेळी सुमारे सडे तीन लाख खर्च करून ते पूर्ण झाले. यावेळी पुलाचे साहित्य इंग्लंडहून आले. दरबारगड ते नजरबागला जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. मच्छू नदीवर बांधलेला हा केबल ब्रिज खूप जुना असल्याने हेरिटेज ब्रिजमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. दिवाळीनंतर गुजराती नववर्षालाच दुरुस्ती करून तो पुन्हा सुरु करण्यात आला होता .

Exit mobile version