४०० पार करण्याचा मार्ग दक्षिणेतून जातो!

पंतप्रधान मोदींचे तीन महिन्यात २० दौरे

४०० पार करण्याचा मार्ग दक्षिणेतून जातो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रचार करत आहेत.यावेळी भाजप दक्षिण भारतातून आपल्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.उत्तर भारतात भाजपची कामगिरी यापूर्वीही चांगली राहिली आहे.त्यामुळे जिथे भाजपची फारशी मजबूत पकड नाही त्या ठिकाणी पक्षाने जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत २० वेळा दक्षिणेकडील राज्यांचा दौरा केला आहे.

गेल्या तीन महिन्यात पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूला सात वेळा, केरळ आणि तेलंगणाला चार वेळा तर कर्नाटकाला तीन वेळा भेट दिली आहे.तसेच पंतप्रधान मोदींनी आंध्रप्रदेशचा दोन वेळा दौरा केला आहे.न्यूज १८च्या बातमीनुसार, एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याने सांगितले की, दिल्लीतील सत्तेचा मार्ग कदाचित उत्तर प्रदेशातून जातो.परंतु, यावेळी एनडीएच्या ४०० पार करण्याच्या लक्ष्याचा मार्ग हा दक्षिणेतून जातो.ते म्हणाले की, आमचे एकच लक्ष्य आहे की, दक्षिणेकडील पाच राज्यातून एनडीएला किमान ५० ते ६० जागा मिळाव्यात.

हे ही वाचा:

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून कोर्टाकडून बाबा रामदेवांना हजर राहण्याचे आदेश!

शरियत कायदा-बहुविवाहच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार

निवडणूक रोख्यांच्या माहितीचा गैरवापर करण्याविरोधात यंत्रणा नाही!

दरम्यान, भाजपने दक्षिणेतील अनेक पक्षांशी युती निश्चित केली आहे. यामध्ये चंद्राबाबू नायडू यांचा पीडीपी, पवन कल्याण यांचा जनसेवा आणि टीटीव्ही दिवाकरन यांच्या पक्षाचा समावेश आहे.

Exit mobile version