४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!

जामनगर झळकले

४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!

कच्छच्या आखाताच्या दक्षिणेला असलेले जामनगर हे गुजरातमधील पाचवे मोठे शहर आहे.जगातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समुळे हे शहर जगाच्या नकाशावर दीर्घकाळापासून आहे.आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेरेमनीमुळे जामनगर अधिकच चमकत आहे. या सोहळ्यामुळे येथे मोठ्या संख्येने खासगी विमाने उपस्थित आहेत. पार्किंगसाठी जागा नसलेल्या येथील विमानतळावर चार दिवसांत सुमारे ४०० व्हीव्हीआयपी चार्टर उड्डाणे व्यवस्थापित करत आहेत. अनंत-राधिकाचे लग्न जुलैमध्ये होणार आहे. याआधी प्री-वेडिंग सेरेमनीच्या सोहळ्यासाठी जगभरातील बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत.

अनंत-राधिका प्री-वेडिंग समारंभात जगभरातील मोठ्या व्यक्ती, सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, लॅरी फिंक, गौतम अदानी, एन चंद्रशेखरन, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल, रिहाना, शाहरुख खान, रणवीर कपूर, दीपिका पदुकोण आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांनी या प्री-वेडिंगला हजेरी लावली.

जामनगर विमानतळावरची माहिती देताना विमानतळ संचालक धनंजय कुमार सिंग यांनी सांगितले की, जामनगर विमानतळावर पार्किंगच्या जागेअभावी राजकोट, पोरबंदर, अहमदाबाद आणि मुंबईसारख्या जवळच्या विमानतळांवर चार्टर विमाने पार्क केली गेली. शुक्रवारी, जामनगर विमानतळावर १४० चार्टर फ्लाइटच्या हालचाली (७० निर्गमन आणि ७० आगमन) नियोजित होत्या.

यातील ५० टक्के विमाने परदेशातून आली असल्याचे त्यांनी सांगितले.विकेंड असल्या कारणाने जामनगर विमानतळावर अनुक्रमे ९० आणि ७० चार्टर विमानांच्या हालचाली अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.४ मार्च रोजी विमानतळावर १०० हून अधिक फ्लाइट्सची हालचाल अपेक्षित आहे, कारण त्या दिवशी बहुतेक व्हीव्हीआयपी निघणार आहेत, असे धनंजय कुमार सिंग यांनी सांगितले.

हे ही वाचा:

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, लश्कर-ए-तोयबाचा गुप्तचर प्रमुख चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू!

देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज ३,५१६ कोटींची भर

युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!

‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही’

ते पुढे म्हणाले, जामनगर विमानतळावर १ मार्च रोजी १४० VVIP चार्टर उड्डाणे, २ मार्च ९०, ३ मार्च ७० आणि ४ मार्च रोजी १०० उड्डाणे अपेक्षित आहेत.तसेच स्पाइसजेटने दुबई ते जामनगरपर्यंत २ मालवाहू उड्डाणे चालवली आहेत.यामध्ये व्हीव्हीआयपी लोकांसाठी खास जेवण होते.प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे जामनगर विमानतळावर तात्पुरते CIQ (कस्टम, इमिग्रेशन आणि क्वारंटाईन) स्थापित करण्यात आले आहे.तसेच विमानतळावरील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

जामनगर विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ऐवजी गुजरात सरकारने प्रदान केलेले सुरक्षा कर्मचारी (पोलीस) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.या अगोदर विमानतळावर सुरक्षेसाठी नेहमी ३५ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येत होते.आता मात्र राज्यसरकारने ही संख्या वाढवून ६० पर्यंत नेली आहे, असे विमानतळ संचालक धनंजय कुमार सिंग यांनी सांगितले.

Exit mobile version