उत्तर प्रदेशात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे.आयकर विभागाने आग्रा,लखनौ आणि कानपूर या ठिकाणी छापा टाकत तब्बल ४० कोटीची रोकड जप्त केली आहे.नोटांची मोजणी अजूनही सुरु आहे.तीन बुटांच्या व्यावसायिकांच्या सहा ठिकाणी आयकर पथकाने छापेमारी करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने शनिवारी (१८ मे) रात्री एमजी रोडवरील बीके शूज, धाकरान येथील मंशु फुटवियर आणि हिंगची मंडी येथील हरमिलाप ट्रेडर्सवर एकत्रित कारवाई केली.छापेमारीत आयकर विभागाच्या पथकाला मोठी रोकड हाती लागली. यामध्ये ५०० रुपयांच्या नोटा आहेत.मोठ्या प्रमाणात रोकड पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले.पैशांच्या मोजणीकरिता बँकांकडून नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले आहे.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ४० कोटी रुपयांची मोजणी झाली असून अजूनही रकमेची मोजणी सुरु आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या रॅलीत पोहोचले सिंगापूरचे उच्चायुक्त, रॅलीचे फोटो टाकत केले कौतुक!
दादरमधील मॅकडोनाल्डला बॉम्बस्फोटाची धमकी!
बहारिनमध्ये सैफुद्दीनचा हिंदू महिलेवर बलात्कार!
उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा!
या बेहिशेबी संपत्तीची चौकशी सुरु केली आहे.तपास शाखेच्या १२ हून अधिक पथकांनी कारवाई केली आहे.मात्र, छाप्याबाबत आयकर विभागाचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीयेत.आयकर विभागाने नोटा मोजण्याची जबाबदारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे.