झारखंडच्या सिंगभूम जिल्ह्यातील चाईबासा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये एक झोनल कमांडर, एक सब-झोनल कमांडर आणि एरिया कमांडरचा समावेश आहे. तर अन्य दोन एरिया कमांडरना अटक करण्यात आली आहे. तसेच ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. दरम्यान, सुरक्षा दलाकडून अजूनही शोधमोहीम सुरु आहे.
झारखंड पोलिसांचे प्रवक्ते आणि आयजी अमोल व्ही. होमकर यांनी सांगितले की, चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले, तर इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
मोदी-पोप भेटीच्या पोस्टवर काँग्रेसचा माफीनामा
जगातील सर्वांत उंच रेल्वेपुलावरून धावली ट्रेन!
‘भाजपवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही’
९०हून अधिक देशांची युक्रेनमधील शांततेसाठी चर्चा!
अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस शोध मोहिमेसाठी बाहेर पडले होते. यादरम्यान लपून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यात चार नक्षलवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर ४८ लाख रुपयांचे बक्षीस होते. दरम्यान, सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरु आहे.