२०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत ४ लाख नोकऱ्या निर्माण

२०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत ४ लाख नोकऱ्या निर्माण

डिसेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीत भारतातील औपचारिक क्षेत्रातील रोजगार चार लाखांनी वाढला आहे. उत्पादन क्षेत्र हे सर्वात मोठे नियोक्ता म्हणून उदयास आले आहे, असे कामगार मंत्रालयाने गुरुवार, २८ एप्रिल रोजी जारी केलेल्या तिसऱ्या तिमाही रोजगार सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

तिसऱ्या तिमाहीच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात उत्पादन,बांधकाम,व्यापार,वाहतूक,शिक्षण, आरोग्य,उपहारगृह आणि वित्तीय सेवा या सर्वांचा रोजगार डेटा मिळवला होता. या क्षेत्रांमध्ये जुलै- सप्टेंबर दरम्यान, दुसऱ्या तिमाहीत ३.१ कोटी रोजगार झाला होता. त्या तुलनेत, ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत ३.१४ कोटी रोजगार झाला आहे. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये, आनंद झाल्याचे म्हणत, रोजगार सर्वेक्षणासाठी निवडलेल्या १० क्षेत्रांपैकी ९ क्ष्रेत्रांचा कल वाढला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे पंतप्रधान येताच ‘चोर चोर’च्या घोषणा

शूजमधून सोनं लपवून तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

अहवालानुसार, अंदाजे एकूण कामगारांच्या संख्येपैकी उत्पादन क्षेत्राचा वाट मोठा आहे. उत्पादन क्षेत्रात ३९ टक्क्यांनी रोजगार वाढला आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात २२ टक्क्यांनी रोजगार वाढला आहे. त्यांनतर आयटी/बीपीओ क्षेत्रामध्ये ११ टक्के कर्मचारी, आरोग्य १०.०४ टक्के, व्यापार ५.३ टक्के आणि वाहतूक क्षेत्रात ४.२ टक्के कर्मचारी आहेत. तसेच उपहारगृहांचा २.६ टक्क्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर आर्थिक सेवांत आणि बांधकाम क्षेत्रात सर्वात कमी योगदान देणारे फक्त २ टक्के कर्मचारी आहेत.

Exit mobile version