आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू  

सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू  

आसाम-मेघालय सीमेवर लाकूड तस्करी बंद असताना मंगळवारी पहाटे हिंसाचार झाला आहे . या हिंसाचारात वनरक्षकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे . पोलिसांनी आसाम-मेघालय सीमेवर बेकायदेशीर लाकूड वाहून नेणारा ट्रक रोखल्यानंतर हिंसाचार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली म्हणाले की आसाम वन विभागाने मेघालय सीमेवर ट्रक थांबवला होता. ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी वनरक्षकांनी गोळीबार केला. गोळीबारात ट्रकचा टायर पंक्चर झाला. वनरक्षकांनी ट्रक चालकासह तिघांना पकडले, मात्र इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.

हे ही वाचा : 

श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’

हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत

कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार

या घटनेची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले. पहाटे पाच वाजता पोलिस येताच काही स्थानिक लोक हातात शस्त्रे घेऊन तेथे पोहोचले. तस्करांना सोडण्याची मागणी करत जमावाने वनरक्षक आणि पोलिसांना घेराव घातला. बचावासाठी जमावावर गोळीबार करावा लागला. हिंसाचारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनरक्षकाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version