दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!

शास्त्रीनगर मधील घटना, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!

दिल्लीतील शास्त्रीनगर येथे गुरुवारी(१४ मार्च) पहाटे एका चार मजली निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.बचावकार्यादरम्यान इमारतीतून चार महिला, तीन पुरुष आणि दोन मुलांसह नऊ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

या दुर्घटनेत चार जणांना होरपळून मृत्यू झाला. मनोज (३०), सुमन (२८) आणि दोन मुले अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास इमारतीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयातील आचाऱ्याच्या मुलीला अमेरिकेची शिष्यवृत्ती

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

‘निवडणूक रोख्यांचा तपशील वेळेत उघड करू’

अनिल परबांकडून रमजान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी

दिल्ली फायर सर्व्हिसेसचे मुख्य अग्निशमन अधिकारी अतुल गर्ग यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.पथकाकडून आग आटोक्यात आणत नऊ जणांना वाचवणायत आले.अनेक जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी नजीकच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.मात्र,आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंग एरियामध्ये लागली.त्यामुळे संपूर्ण परिसर धुराने भरला होता. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस, तीन पीसीआर व्हॅन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर प्रत्येक मजल्याचा शोध घेत, पीडितांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version