लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही पैशांचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सर्वत्र नजर ठेवून आहेत.पोलीस आणि निवडणूक आयोगाने देशासह राज्यभरात मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे.दरम्यान, मुंबई पोलिसांना देखील मोठं यश मिळालं आहे.मुंबईतील पवई परिसरात नाकाबंदी दरम्यान एका व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाखांची रोकड पोलिसांच्या हाती लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान एक कॅश व्हॅन घेऊ जात असताना पोलिसांनी व्हॅनला अडवले आणि चौकशी करत तपासणी केली.तपासणी वेळी पवई पोलिसांना व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाख रुपये सापडले.पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला.
हे ही वाचा:
पित्रोडांचा नवा शोध, पूर्व भारतीय चिनींसारखे तर दक्षिण भारतीय ‘आफ्रिकन’
पाकिस्तानला कशाला हवी अमेठीची चिंता?
अतिक्रमण करून ती मालमत्ता आपलीच म्हणणे ही वक्फ बोर्डाची सवय
कर्मचारी अचानक आजारी पडले; एअर इंडियाची ७८ उड्डाणे रद्द
यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.