मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा झाल्याचा दावा करीत, मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय नागरिक करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मालेगाव दौरा करत जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी सगळ्यांची चौकशी आणि कारवाई होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. याच दरम्यान, आता मालेगाव महापालिकेचे उप निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांना अटक केली आहे. जन्म प्रमाणपत्रात घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली.
मालेगावमध्ये ३९७७ बांगलादेशींनी खोटे कागदपत्रे देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर मालेगावातील छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मालेगाव महापालिकेचे उप निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासणीमध्ये आढळून आले.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांना अटक केली. अब्दुल तवाब यांच्या अटकेमुळे त्यांनी जन्म प्रमाणपत्र घोटाळा केला हे निष्पन्न झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर मालेगाव महापालिकेने देखील अब्दुल तवाब यांना बडतर्फ केले आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
हे ही वाचा :
हरियाणा: २५ कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त, पाकिस्तानी चलनासह २ तस्करांना अटक!
कर्नाटक: ४०० वर्षे राज्य केले मग मुस्लिमांना सूट का?
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे १७ वर्षे ऑडिटच नाही, बोर्ड बरखास्त करण्याची मागणी
सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स विरुद्ध दमदार सुरुवात करण्यास सज्ज
दरम्यान, राज्यासह देशभरात बांगलादेशी घुसखोर आढळून येत आहेत. अशा घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची सतत मागणी भाजपा करत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देवून अशा घुसखोरांची माहिती गोळा करत आहेत, जिल्ह्यातील विवध तहसील कार्यालयाला भेट देवून जन्म प्रमाण पत्राबाबत माहिती घेत आहेत. घोटाळयामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. मालेगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये असा घोटाळा झाल्याचा आरोप ते सतत करत आहेत.
“बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा”
मालेगाव महापालिकेचे उप निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांची अटक
मालेगाव महापालिकेने अब्दुल तवाब यांना बडतर्फ केले आहे. अब्दुल तवाब यांनी मालेगाव महापालिकेचे बनावटी प्रमाणपत्र छापले होते
मालेगाव मध्ये 3977 जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा pic.twitter.com/MzyQGQmNQI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 22, 2025