कुर्ल्यातील इमारतीमध्ये लागलेल्या आगीत ३९ जण जखमी

६० लोकांना वाचविण्यात यश

कुर्ल्यातील इमारतीमध्ये लागलेल्या आगीत ३९ जण जखमी

मुंबईतील कुर्ला येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कुर्ला येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याने मोठी गडबड उडाली. या भीषण आगीत सुमारे ३९ नागरिक जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमनल दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे ६० लोकांना सुखरूप बाहेर काढले.

कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर हॉस्पिटलसमोरील १२ मजली इमारतीमध्ये शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आग लागली. यावेळी इमारतीत जवळपास ५० ते ६० जण अडकले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळविण्यात आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. मात्र, आगीच्या धुरामुळे सुमारे ४३ रहिवाशांना त्रास होऊ लागला, त्यापैकी ३९ जणांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. तर उर्वरित चौघांना कोहिनूर रुग्णालयात नेण्यात आले. त्या सर्वांवर उपचार सुरू असून काहींना घरी पाठविण्यात आले.

हे ही वाचा:

बारामुल्लामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

निपाह व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील शैक्षणिक संस्था बंद

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

दरम्यान, अग्निशमनल दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Exit mobile version