३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

३३ कॅबिनेट, ६ राज्यमंत्री, २० नवे चेहरे

३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (१५ डिसेंबर) पार पडला. या मंत्री मंडळाचा शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनात पार पडला. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली. यावेळी ३९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही अनुभवी चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होवून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती. यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे साऱ्याचे लक्ष लागलेलं असताना अखेर आज नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. महायुतीच्या आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

हिवाळी अधिवेशनाच्या आधी हा शपथविधी सोहळा पार पडला. आता महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शपथसोहळ्यात भाजपच्या १९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

३९ आमदारांनी पैकी ३३ आमदारांना कॅबिनेट तर ६ आमदारांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. भाजपाच्या ९ तर शिंदे गटाच्या ६ नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाच्या ५ नव्या चेहऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

हे ही वाचा : 

हिंदूंवरील अत्याचारा विरोधात मुलुंड चेकनाका ते विक्रोळीत ‘मानव शृंखला अभियान’

मुस्लिम बहुसंख्यांपेक्षा मोठे असू शकतात

हिंदुंवरील हिंसाचार प्रकरणी बांगलादेश सरकारला येतेय जाग!

नक्षलवाद्यांचा कमांडरच सांगतो आहे की, लोकांना बंदूक नको, विकास हवा!

भाजपाच्या आमदारांची यादी
चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, जय कुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उइके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर

राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी
हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक.

शिवसेना शिंदे गटाची यादी
गुलाब पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल, योगेश कदम,

Exit mobile version