संभाजीनगरात मोबाईलच्या दुकानात सापडले ३९ लाख, नोटा मोजण्याचे मशीन!

चौघांना अटक

संभाजीनगरात मोबाईलच्या दुकानात सापडले ३९ लाख, नोटा मोजण्याचे मशीन!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी राज्यात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस नजर ठेवून आहेत.दरम्यान, छत्रपती संभाजीनगर मध्ये शनिवारी(११ मे) रात्री उशिरा एका मोबाईल दुकानातून ३९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.तसेच दुकानातून नोटा मोजण्याच्या मशीन देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.या प्रकरणी चार आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली.शहरातील पैठण गेट येथील एका मोबाईलच्या दुकानात ही छापेमारी करण्यात आली.या छाप्यात तब्बल ३९ लाख रुपये रोकड पोलिसांनी जप्त केली.या प्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड अस्लम खान इस्माईल शेख रिजवान आणि शेख शफिक या चौघांना अटक करण्यात आली.दुकान चालकाकडून या रकमेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.जप्त करण्यात आलेल्या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा:

बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

‘राफा रिकामे करा, नाहीतर घुसतो!’

बंगाल म्हणजे बॉम्बचे घर? भाजपा नेत्याच्या घरातच बॉम्ब पेरले

‘झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीचे समन्स’

 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पथकाने कारवाई करत ३९ लाख रुपये जप्त केली आहे.या रकमेचा वापर निवणुकीसाठी होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली.या रकमेबाबत चौघांना विचारण्यात आले मात्र आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही.त्यामुळे त्या चौघांवर गुन्हा दाखल करून सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version