भायखळा तुरुंगात तब्बल ३९ कैद्यांना झाला कोरोना

भायखळा तुरुंगात तब्बल ३९ कैद्यांना झाला कोरोना

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असतानाच मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. भायखळामधील महिलांसाठी असलेल्या तुरुंगात गेल्या १० दिवसांमध्ये सहा मुलांसह ३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भायखळा महिला कारागृहात गेल्या १० दिवसांपासून ३९ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णांपैकी ३६ जणांना जवळच असणाऱ्या एका शाळेत उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे, तर वरिष्ठ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. गर्भवती महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

हे ही वाचा:

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

देऊळ बंद…कुंकू रुसलं!

आरे कारशेडच्या विरोधामुळे मेट्रो चार वर्षे ताटकळणार!

संजय राऊत यांना लस ‘टोचली’; चिदंबरम यांना भाषण झोंबले

कारागृहात एकाचवेळी ३९ कैदी कोरोनाबाधित आढळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्याच आठवड्यात तुरुगांत कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. तेव्हाच कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली, असे कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने लागण झालेल्या कैद्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांनासुद्धा उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तुरुंगाच्या आतमध्ये वेळोवेळी कोरोना तपासणीची मोहीम राबवली जाते, अशी माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली आहे. पालिकेच्या ई- वॉर्डच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याने ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, कारागृहाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले गेलेले नाही.

Exit mobile version