आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज

बेंगळुरू येथे २६ जून ते १९ जुलै होणार शिबीर

आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज

२६ जून ते १९ जुलै या कालावधीत बेंगळुरू येथे होत असलेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३९ सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या हिरो आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ तयारी करत आहे. यात मलेशिया, कोरिया, पाकिस्तान, जपान हे देशही सहभागी होणार आहेत.

या ३९ सदस्यीय संघात गोलरक्षक कृष्णबहादूर पाठक, पीआर. श्रीजेश, सूरज करकेरा, बचावपटू हरमनप्रीत सिंह. सुरेंद्र कुमार, वरुण कुमार, मधल्या फळीतील खेळाडू मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, आघाडीचा खेळाडू एस. कार्थी, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय यांचा समावेश आहे. हे शिबीर स्पेनच्या दौऱ्याआधी संपुष्टात येईल. तिथे २५ ते ३० जुलै या कालावधीत भारतीय संघ खेळणार आहे. स्पॅनिश हॉकी संघटना आपल्या १०० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करत असून त्यात इंग्लंड, स्पेन, नेदरलँड हे देश सहभागी होतील. त्यानंतर भारतीय खेळाडू हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळतील.

भारतीय संघाचे प्रशिक्षक क्रेगन फुल्टन यांनी या शिबिराबद्दल सांगितले की, खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा समन्वय साधला जावा, त्यांचे तंत्र अधिक उत्तम व्हावे यासाठी आयोजित केले आहे. हिरो आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहेत. त्यादृष्टीकोनातून हे शिबीर महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा:

‘पंतप्रधान मोदी’ आणि ‘इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबौली’ यांची भेट!

वॅग्नरच्या बंडानंतर झेलेन्स्की काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

भारतीय संघातील खेळाडू असे गोलरक्षक

कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश, सूरज करकेरा, पवन मलिक, प्रशांत कुमार चौहान

बचावपटू

जर्मेनप्रीत सिंह, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंह, जुगराज सिंह, मनदीप मोर, नीलम संजीव, संजय, यशदीप सिवाच, दीपसन तिर्की, मनजीत.

मधली फळी

मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, मोइरांथेम रवीचंद्र सिंह, शमशेर सिंह, नीलकंठ शर्मा, राजकुमार पाल, सुमित, आकाशदीप सिंह, गुरजंट सिंह, मोहम्मद राहील मौसिन, मणिंदर.

आघाडीची फळी

एस. कार्थी, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंह, सुखजीत सिंह, सिमरनजीत सिंह, शिलानंद लकडा, पवन राजभर.

Exit mobile version