27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेष‘३७० जागांचा दावा हा अंदाजपंचे आकडा नाही’

‘३७० जागांचा दावा हा अंदाजपंचे आकडा नाही’

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा दावा

Google News Follow

Related

चालू लोकसभा निवडणुकीत स्वबळावर किमान ३७० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे, याबाबत एका मुलाखतीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विचारले असता, ‘३७०चे लक्ष्य ही एक घोषणा आहे. त्यात लक्ष्य गाठण्याचा विचार करण्यात आला आहे. मला वाटत नाही की, पंतप्रधान मोदींनी कधीही अंदाचपंचे या आकड्याचा उल्लेख केला आहे,’ असे जयशंकर यांनी ठामपणे एनडीटीव्हीला सांगितले.

‘पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमध्ये, आम्ही आमचे स्थान राखण्यात सक्षम होऊ आणि काही राज्यांमध्ये आम्ही आमच्या जागा वाढवू,’ असे त्यांनी सांगितले. तथापि, यापैकी काही राज्ये भाजपचे पारंपरिक बालेकिल्ले नसल्यामुळे, तेथे चांगली कामगिरी कशी होईल, असा प्रश्न जयशंकर यांना विचारण्यात आला. त्यावर ‘भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे आणि तो अंदाजावर अवलंबून नाही. आम्ही मतदान केंद्रस्तरावर विश्लेषण करतो आणि मार्गक्रमण करतो. या राज्यात आम्हाला एवढ्या जागा मिळतील, यामागे आम्ही खूप विचार केला आहे,’ असे उत्तर त्यांनी दिले.

हे ही वाचा:

‘जो काँग्रेसच्या पावलावर चालेल, तो रसातळाला जाईल’

‘अरविंद केजरीवाल हे ‘अनुभवी’ चोर’

मोहाली पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई, ४.३७ कोटी रुपयांची रोकड जप्त!

मीडियाचा डाव फडणवीसांनी उधळला !

अनेकांनी भाजपच्या ३७०हून अधिक जागा मिळवणाऱ्या लक्ष्याचा संबंध नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याशी जोडला आहे. ऑगस्ट २०१९मध्ये, मोदी सरकार सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या काही महिन्यांनंतर, जम्मू आणि काश्मीरला ‘विशेष दर्जा’ देणारा कायदा रद्द करण्यात आला आणि पूर्वीचे राज्य जम्मू आणि काश्मीर व लडाख या दोन विद्यमान केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले: एकूणच, सध्याच्या निवडणुकीत ५४३ सदस्यीय लोकसभेत आपल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी घटकपक्षांसह ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे सत्ताधारी पक्षाचे लक्ष्य आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा