बुधवारी वांद्रे-वरळी सी-लिंकवर अपघातात पाच सुरक्षा रक्षकांचा मृत्यू आणि काही जण जखमी झाले होते. ज्या चालकाकडून तो अपघात झाला होता त्या चालकाने अनेकवेळा वाहतूक नियमांचा भंग केलेला आहे. त्यासाठी त्याने ३६ हजार ७०० रु दंड भरणे अपेक्षित पण त्यातील त्याने फक्त आठ हजार रुपये भरले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या चालक इरफान बिलकिया याला शुक्रवारी दादर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सी लिंक वर झालेल्या अपघाताचा वरळी पोलीस तपास करत आहेत. अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग किती होता हे तपासण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी वाहतूक पोलिस मुख्यालयाला भेट दिली होती. या अपघातात गाडीचा चालक इरफान बिलकिया याला अटक झाली आहे. त्याला शुक्रवारी दादर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी गुन्हेगाराची तपासणी केली असता त्याच्या बिल्ल्यावर तब्बल वाहतूक नियमांचा भंग केल्याचे ३५ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
वरळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमर जगदाळे यांनी न्यायालयाला सांगितले की, इरफान बिलकिया याच्या बिलक्यावर ३५ वाहतूक गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी इरफान बिलकिया याच्या वकिलाने युक्तिवाद करताना सांगितले की, हे गुन्हे नसून उल्लंघन होते. उल्लंघन कारच्या विरोधात आहे. माझ्या क्लायंटने नियमाचे उल्लंघन केले आहे हे पोलीस कसे सिद्ध करू शकतात. कारण ज्या वाहनाने अपघात झाला ते वाहन बिल्कियाच्या भावाच्या नावावर नोंदणीकृत आहे.
हे ही वाचा:
लष्कर आता ‘हे’ भाग आयात करणार नाही
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन
दरम्यान, याप्रकरणाची आणखी सखोल चौकशी सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी सांगितले की कार सी लिंकवर आली तेव्हा ताशी ८५ किमी पेक्षा कमी वेगाने जात होती आणि त्यानंतर तिचा वेग वाढला असावा. तसेच अपघाताच्या वेळी त्या व्हॅनच्या विरुद्ध दिशेनेही कॉटन वाहन येत नव्हते. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.